ऑत्क्रितिये अरेना (रशियन:Открытие Арена) तथा स्पार्ताक मैदान हे रशियाच्या मॉस्को शहरातील क्रीडामैदान आहे. मुख्यत्वे फुटबॉलसाठी वापरले जाणारे हे मैदान स्पार्ताक मॉस्को फुटबॉल संघाचे घरचे मैदान आहे. येथे रशियाच्या राष्ट्रीय फुटबॉल संघाचे काही सामनेही खेळले जातात. २०१८ फिफा विश्वचषकाचे निवडक सामने येथे खेळले जातील.
याचे बांधकाम २०१०मध्ये सुरू झाले व २०१४मध्ये उद्घाटन झाले. येथून जवळ बांधण्यात आलेले स्पार्ताक मेट्रो स्थानक २०१५मध्ये प्रवाशांसाठी खुले झाले. हे स्थानक १९७५मध्ये बांधले गेले होते.