नायगारा धबधबा

नायगारा धबधबा हा जगातील सर्वांत मोठ्या धबधब्यांपैकी एक आहे. हा धबधबा अमेरिकेतील नायगारा नदीवर असून अमेरिका आणि कॅनडा ह्या देशांच्या सरहद्दीवर आहे. न्यू जर्सीपासून नायगारा साधारण ४०० मैल दूर असून अमेरिकेतील बफेलो या शहराच्या जवळ आहे. ज्यात प्रत्येक मिनिटाला ४० लाख चौरस फूट (की घनफूट? ) पाणी पडते असा हा त्या अर्थाने, जगातील सर्वांत मोठा धबधबा आहे.

गोट आयलंडने या धबधब्याचे २ मोठे भाग केले आहेत. हॉर्स शू फॉल्स आणि अमेरिकन फॉल्स. हॉर्स शू फॉल्स हा कॅनडाच्या सीमेला लागून असून त्यानंतर अमेरिकन प्रदेश चालू होतो आणि नंतर दुसरा म्हणजे अमेरिकन फॉल्स. हिमयुगामध्ये झालेल्या विविध भौगोलिक हालचालींमध्ये, या परिसरातील प्रस्तर एकावर एक चढल्याने हा प्रदेश तयार झाला असून त्यामुळे नायगारा नदीला इतका मोठा धबधबा प्राप्त झाला आहे. साधारणपणे १०००० वर्षांपूर्वी नायगारा धबधबा आणि अमेरिकेतील ग्रेट लेक्स तयार झाले आणि हा मोठा पाण्याचा प्रवाह तयार झाला.

अतीव सौंदर्य आणि आणि प्रचंड वीजनिर्मिती या दोनही कारणांसाठी हा धबधबा प्रसिद्ध असून दर वर्षी कोट्यवधी पर्यटक केवळ हा धबधबा पाहण्यासाठी अमेरिका आणि कॅनडा या दोन्ही देशांत येतात. १९८० सालानंतर कॅनडा सरकारने नायगारा आणि पर्यटन यांच्यावर खूप विचार करून कॅनडाच्या बाजूला अनेक चांगली हॉटेल्स आणि पर्यटकांना आवडेल अशा अनेक गोष्टी केल्या. येथे दोन्ही देश जोडणारा एक मोठा पूल असून पूर्वी हा धबधबा अमेरिका आणि कॅनडा या दोन्ही बाजूंनी एकाच व्हिसा वर पाहता यायचा. पण ७/११ नंतर सुरक्षेच्या कारणास्तव हे सर्व प्रकार बंद झाले आणि आता दोन्ही देशांचा व्हिसा असल्याशिवाय दोन्ही बाजूंनी हा पाहता येत नाही. हॉर्स शू फॉल्स ची उंची १७३ फूट असून तो २६०० फूट लांब आहे. तर अमेरिकन फॉल्स ८० ते १०० फूट उंच असून त्याची लांबी १०६० फूट आहे. या धबधब्यातून १८७ मेगावॉट एवढी वीजनिर्मिती होते. या धबधब्यामुळे जमिनीची मोठ्या प्रमाणात झीज होते. ती टाळण्यासाठी १९६९ मध्ये अमेरिकन फॉल्स काही काळासाठी पूर्ण बंद करण्यात आला होता !!! जास्तीचे पाणी तेव्हा हॉर्स शू फॉल्समधून सोडण्यात आले होते. जमिनीखालचे पाण्याचे प्रवाह काळजीपूर्वक बंद करून जमिनीची झीज होणार नाही याची काळजी घेतली गेली. यासाठी एक छोटेसे तात्पुरते धरण अमेरिकन फॉल्सच्या अलीकडे बांधण्यात आले होते. त्याचे तेव्हाचे फोटो त्यांनी जतन करून ठेवले आहेत. सर्व डागडुजी करून झाल्यावर बॉम्बने हे धरण उडवून देण्यात आले आणि परत अमेरिकन फॉल्सचा जलप्रवाह सुरू झाला.

मेड ऑफ द मिस्ट टूर

१८४८ साली सुरू झालेली या नावाची ही बोट आजही आपल्याला 'नायगाराची सफर घडवते. धबधब्याचे पाणी पडल्यावर खालच्या नदीतल्या पाण्यामध्ये सफर करायची बोट म्हणजे 'मेड ऑफ द मिस्ट टूर' (Maid of the mist Tour). तिकीट काढायचे आणि निळ्या किंवा पिवळ्या रंगाचा रेनकोट अंगावर चढवायचा आणि 'मेड ऑफ द मिस्ट टूर'च्या बोटीत डेकवर जाऊन उभे राहायचे. ही बोट आपल्याला दोन्ही धबधब्यांच्या अगदी जवळून चक्कर मारून आणते. दोन्ही धबधब्यांच्या फेसाळणाऱ्या प्रवाहाचे उडणारे पाणी अंगावर घेत या बोटीतून फिरायचे. पाण्याचे तुषार इतके जोरात अंगावर येत असतात की आपण त्यात चिंब भिजूनच जातो. त्यामुळे धबधब्याच्या जवळून फोटो काढणे हे जरा अवघडच जाते. दोन्ही धबधब्यांच्या अगदी जवळून जाता येत असल्याने फार मजा येते.

केव्ह ऑफ द विंड्स

केव्ह ऑफ द विंड्स येथूनही निळ्या किंवा पिवळ्या रंगाचा रेनकोट अंगावर चढवून नायगारा धबधबा अगदी जवळून न्याहाळता येतो.

नायगारावरती एक छान फिल्म ही आयनॉक्स थियेटर येथे दाखवण्यात येते. नायगारा धबधब्याच्या अनेक रंजक कथा आहेत. अनेक जणांनी या धबधब्यात उडी मारून खाली जिवंत राहण्याचा पराक्रम केला आहे. याची सुरुवात १८२९ साली झाली. १९०१ साली ६३ वर्षीय एनी एड्सन या एका शाळेच्या शिक्षिकेने पहिल्यांदा ड्रममधून या धबधब्यात उडी मारायचा पराक्रम केला. तिला यात खूप त्रास झाला पण फारशी इजा झाली नाही. तिच्यानंतर एकूण १४ जणांनी असे उपद्व्याप केले.

नायगारा धबधबा पहायची खरी मजा आहे रात्री. आणि ती कॅनडाच्या बाजूने. हॉर्स शू फॉल्स मधून पडणाऱ्या पाण्यावर कॅनडाच्या बाजूने प्रकाशाचे झोत सोडलेले आहेत आणि नायगारा धबधब्यावर सोडलेले लाईट त्या बाजूनेच चांगले दिसतात, अमेरिकेच्या बाजूने एवढे छान दिसत नाहीत. रात्रीच्या वेळी धबधब्याच्या पाण्याचा पडणारा आवाज आणि वेगवेगळ्या रंगात दिसणार पाणी पाहताना नजर तेथून ढळत नाही. कितीही वेळ तिथे थांबलात तरी तिथून निघावेसे वाटत नाही. दर मिनिटाला पाण्याचे बदलणारे रंग आणि वेगवेगळ्या रंगात न्हाऊन निघालेला नायगारा धबधबा हे खरोखर जगातील एक आश्चर्यच आहे. एका सर्वेक्षणानुसार या वर्षी एकूण २ कोटी ८० लाख लोक नायागाराचे दर्शन घेण्यासाठी अख्या जगातून येतील असा अंदाज आहे.

पर्यटन स्थळे

  • इगुअझू फॉल्स

बाह्य दुवे

जगातील धबधबे

नायगारा फॉल्स अमेरिकन अधिकृत संकेतस्थळ

नायगारा फॉल्स कॅनेडियन अधिकृत संकेतस्थळ

Listed in the following categories:
एक टिप्पणी पोस्ट करा
टिपा आणि इशारे
द्वारा व्यवस्था करा:
John George
14 August 2015
The view is amazing. Come later in the day so you can stick around for the fall lighting show, and fireworks if there are any. Boat tour recommend! Cheap parking just past the Skylon tower parking.
John Hankus
9 March 2015
Best place to view the falls. Walk the entire length for some nice scenery. Lots of tourists around in your way though. Don't be that guy who stops his car in the road for pictures. Pay for parking.
aeroRafa
21 January 2013
If you like photography, the tower on the Canadian side has the best view. Winter is the best time to visit. People don't like the cold so you an get great shots without tourists crossing your path
Gergely Nagy
8 October 2015
This is rather a mini Las Vegas than a city around the falls now already. What more is to come? Perfect place to party in the night if you have the budget for it.
Wladimir Coutinho Mesquita
Amazing!!! Beautiful during the day and amazing during the night with the LED Lights changing colors on the Falls. Loved it!
Deborah Lynn Rumble-Dani         BA 1995
Hotels and restaurants around Niagara Falls are not too expensive and the food is high quality with excellent service. The Falls are magnificent and worth it to see.
नकाशा
6650 Niagara Pkwy, Niagara Falls, ON L2G, कॅनडा दिशानिर्देश मिळवा
Wed 11:00 AM–4:00 PM
Thu 11:00 AM–6:00 PM
Fri-Sun 10:00 AM–10:00 PM
Mon 10:00 AM–7:00 PM

Niagara Falls (Canadian Side) रोजी Foursquare

नायगारा धबधबा रोजी Facebook

Home sweet Home

प्रारंभ करत आहे $25

Sheraton Niagara Falls

प्रारंभ करत आहे $150

Wyndham Garden at Niagara Falls

प्रारंभ करत आहे $128

Rodeway Inn

प्रारंभ करत आहे $78

Howard Johnson by Wyndham Closest to the Falls and Casino

प्रारंभ करत आहे $74

Redwood Bed and Breakfast

प्रारंभ करत आहे $116

जवळपास शिफारस केलेल्या दृष्टी

सर्व पाहा सर्व पाहा
विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Cave of the Winds (New York)

The Cave of the Winds was a natural cave behind Bridal Veil Falls at

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Prospect Point Park observation tower

The Prospect Point Park Observation tower is located in Niagara Falls,

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
MarineLand

Marineland is a themed amusement and animal exhibition park in the

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Niagara Falls Sky Wheel

The Niagara SkyWheel is a 175 feet (53 m) tall Ferris wheel located

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Criminals Hall of Fame

The Criminals Hall of Fame Wax Museum is a wax museum on 5751 Victoria

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Bird Kingdom

Bird Kingdom, is located in the tourist district of Niagara Falls,

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
नायगारा नदी

नायगारा नदी (इंग्लिश: Niagara River) ही उत्तर अमेरिकेतील ईरी व ऑन्टारि

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Niagara Science Museum

The Niagara Science Museum is located in the original National Caron

अशीच पर्यटकांची आकर्षणे

सर्व पाहा सर्व पाहा
विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Minnehaha Falls

Minnehaha Creek is a tributary of the Mississippi River located in

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Bridal Veil Falls (Oregon)

Bridal Veil Falls is a waterfall located on the Columbia River Gorge

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Goðafoss

The Goðafoss (Icelandic: waterfall of the gods or waterfall of the

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Garganta del Diablo

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Seljalandsfoss

Seljalandsfoss is one of the most famous waterfalls of Iceland. It is

सर्व समान ठिकाणे पहा