लेक पॅलेस

भारताच्या उदयपूर येथील पिछोला सरोवरामध्ये ४ एकराच्या बेटावर लेक पॅलेस ( जग निवास या नावानं ओळखले जाणारे ) हे आलिशान हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये ८३ खोल्या आणि कक्ष असून पांढ-या शुभ्र संगमरवरी दगडापासून मजबूत भिंती बांधलेल्या आहेत. सरोवराच्या किना-यापासून हॉटेलपर्यंतच्या प्रवासासाठी हॉटेलने एका बोटीची व्यवस्था केलेली आहे. संपूर्ण भारतात आणि जगामध्येसुध्दा हे रोमांचकारी ठिकाण म्हणून गणले जाते.




इतिहास

इ.स.१७४३ - १७४६ च्या सुमारास राजस्थानच्या उदयपूरचे दुसरे महाराणा जगत सिंह ( मेवाड राजघराण्याचे ६२ वे वारसदार ) याच्या मार्गदर्शनाखाली उन्हाळयाच्या दिवसांत त्यांचे निवासस्थान म्हणून या महालाचे बांधकाम चालु केले. जगत सिंहाने बांधकाम केल्यामुळे हा महाल जग निवास या नावाने ओळखला जाउू लागला. निवासस्थानात राहणा-या रहिवाशांना पहाटे उठून सूर्यदेवाची पूजा करता यावी म्हणून या महाल पूर्वेकडे बांधलेला आहे. त्यानंतरच्या राज्यकर्त्यांनी या थंडगार जागेचा वापर उन्हाळी दिवसांत राहण्यायोग्य निवासस्थान म्हणून केला. नक्षीकाम केलेले खांब, कारंज्या, बागा, गच्च्या अशा रमणीय वातावरणात येथे दरबार भरविला जात असे.

जग मंदिर बेटपासून राजवाडाच्या आणि उदयपूर शहर सारखा संबंध बदलणारा देखावा

राजमहालातील वरील भागात २१ फूटाच्या (६.४ मीटर) गोलाकार खोल्या आहेत. संपूर्ण हॉटेलमध्ये पांढरे शुभ्र संगमरवरी तसेच रंगीबेरंगी दगड वापरून पानं, फुले, वर्तुळे इ. चे नक्षीकाम केलेले सर्वोत्तम असे गोलाकार घुमट बांधलेले आहे.

१८५७ मध्ये ब्रिटीश सैन्यातील हिंदी शिपायांनी केलेल्या बंडाच्या वेळी कित्येक युरोपियन कुटुंबिय परागंदा होवून या बेटाच्या आश्रयाला आले होते , त्यावेळी महाराणा स्वरुप सिंह यांनी त्या युरोपियन कुटुंबियांना या राजमहालामध्येआसरा दिला. बंडखोर त्यांच्यापर्यंत पोहोचू नयेत या हेतुने महाराजांनी किंना-यावरील सर्व बोटींचा नाश केला.

१९ व्या शतकाच्या मध्यापर्यंत मात्र या राजमहालाची रया हळूहळू कमी होवु लागली व या महालाचे रुपांतर एका बकाल वस्तीत होवू लागले.

महाराणा सर भोपाळ सिंहाच्या कालावधीमध्ये (१९३०-५५) या महालाबरोबरच चंद्रप्रकाश महालाची जबाबदारी सोपविण्यात आलेली असल्यामुळे जग निवास महालाकडे दुर्लक्ष होत गेले आणि त्याचे सौंदर्य लोप पावू लागले. पण त्यानंतरच्या काळात भगवत सिंह यांनी या राजमहालाचे रुपांतर उदयपूरच्या पहिल्या एैषआरामी हॉटेलमध्ये करण्याचे ठरविले. अमेरीकेतील कलाकार डीडी नावाच्या कंत्राटदाराने हॉटेलचा आराखडा तयार केला.

या हॉटेलचे बांधकाम एक रोमांचकारी अनुभव देणारे साहस असल्याचे या कलाकाराने नमूद केलेले आहे. हे बांधकाम पूर्णत्वाला नेताना अनेक संकटांचा सामना त्याला करावा लागला आणि खूप कमी भांडवलामध्ये हे त्याने शक्य करुन दाखवले होते. या राजमहालामध्ये काम करणा-या ३०० नर्तकींचे काय करायचे हा मोठा प्रश्न त्याच्यासमोर उभा राहिला होता. त्यावेळी त्याने त्या नर्तकींना नर्सच्या कामाचं प्रशिक्षण देण्याची तयारी दर्शविली होती. परंतू त्या शेवटपर्यंत महाल सोडायला तयार झाल्या नाहीत. त्या हॉटेलमध्ये राहून काही विशिष्ट प्रसंगामध्ये अजूनही त्या पारंपारिक लोकनृत्य सादर करत असतात.

१९७१ मध्ये ताज हॉटेल च्या मालकांनी टाटा समूहाने या हॉटेलचे व्यवस्थापनाचे काम हातात घेतले आणि ७५ खोल्या नवीन बांधून काढल्या. टाटा समूहाचे तरुण व्यवस्थापक जामशेड डी. एफ. लॅम यांनी या राजमहालाचे भूतकाळातील वैभव पुन्हा परत मिळवून देण्यासाठी सर्वोत्तम कारागिरांकडे कामगिरी सोपविली आणि या सगळयांनी केलेल्या अथक प्रयत्नांतून या राजमहालाचे ऐषआरामी आणि आलिशान हॉटेलमध्ये रुपांतरीत झाले.

२००० मध्ये या हॉटेलचे पुन्हा पर्नरचना करण्यात आली.

या हॉटेमध्ये काम करणारे ‘रॉयल बटलर’ पूर्वीपासून महालाच्या जागेची देखरेख करणा-यांचे वंशज आहेत.

ट्रीव्हीआ

लॉर्ड कर्झन, विविन लिघ, राणी एलिझाबेथ, इराणचे शाह , नेपाळचे राजे आणि जॅकलिन केनेडी यासारख्या दिग्गजांनी या हॉटेलमध्ये पाहुणचार घेतलेला आहे.

या महालामध्ये खालील चित्रपटांचे चित्रिकरण करण्यात आलेले आहे.

  • १९५९ : फ्रीझ लँग चा ‘द टायगर ऑफ इश्नापूर’ आणि ‘द इंडियन थॉम्ब’
  • १९८३ : जेम्स बोन्ड चा ‘ऑक्टोपसी’
  • १९८४ : ब्रिटीश दूरदर्शनवरील मालिका ‘द ज्वेल इन द क्राउुन’
  • २००१ : बॉलिवूडच्या सुभाष घईंचा ‘यादे’
  • २००६ : तारसेम सिंग चा ‘द फॉल’
  • ‘मेरा साया’ या चित्रपटाचे चित्रिकरण येथे झाले.
  • २०१३ : ‘ये जवानी है दिवानी’ याचे चित्रिकरण येथे झाले आहे.
Listed in the following categories:
एक टिप्पणी पोस्ट करा
टिपा आणि इशारे
द्वारा व्यवस्था करा:
Filmsquare
2 June 2013
The Taj Lake Palace is used in the James Bond film Octopussy (1983) as the titular character's retreat. Guarded entirely by women, the palace houses a secret sisterhood of smugglers.
Travel + Leisure
6 August 2014
For a day trip to the Jaisamand Wildlife Sanctuary or into the city of Udaipur, hire one of the hotel’s vintage cars and take advantage of the property’s personal butler program.
Curbed
24 March 2014
Though in 1983's Octopussy it plays the exotic personal palace of the titular villain, Taj Lake Palace is actually a luxury hotel, built in the 18th century on four acres of Jag Niwas island.
Travel + Leisure
6 August 2014
Décor is nothing less than opulent, with classic interiors enhanced by colorful frescoes, glistening mosaics, and rich silks.
HISTORY TV18
20 February 2013
Most of the rooms offer a view of' the lake along with the City Palace, Aravali mountain ranges and/or the Jag Mandir Palace, the neighboring island palace.
Najla Alghanim
13 March 2018
Will always be my favorite hotel, everything is perfect, their service is exceptional .
8.1/10
108,263 लोक येथे आले आहेत
नकाशा
0.4km from 0/8, Candpole, Maji Ka Mandir, Ambamata, Udaipur, Rajasthan 313001, भारत दिशानिर्देश मिळवा
Wed 8:00 AM–3:00 PM
Thu 7:00 AM–8:00 AM
Fri 8:00 AM–9:00 AM
Sat 9:00 AM–9:00 PM
Sun 7:00 AM–Midnight
Mon 9:00 AM–Noon

Taj Lake Palace रोजी Foursquare

लेक पॅलेस रोजी Facebook

RADISSON UDAIPUR

प्रारंभ करत आहे $0

Bonfire Heritage Pichola

प्रारंभ करत आहे $0

Rk residency

प्रारंभ करत आहे $28

Treebo Park Classic

प्रारंभ करत आहे $20

Bonfire Heritage Fatehsagar

प्रारंभ करत आहे $0

SNP House Airport Hotel & Restaurant

प्रारंभ करत आहे $69

जवळपास शिफारस केलेल्या दृष्टी

सर्व पाहा सर्व पाहा
विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Ambrai Ghat

Ambrai Ghat or Manjhi Ghat is a main ghat situated near the waterfront

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
City Palace, Udaipur

City Palace, Udaipur, is a palace complex in Udaipur, in the Indian

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Gangaur Ghat

Gangaur Ghat or Gangori Ghat is a main ghat situated near the

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Lake Pichola

Lake Pichola, situated in Udaipur city in the Indian state of

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Fateh Sagar Lake

Fateh Sagar Lake is situated in Udaipur city in the Indian state of

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Udaipur Solar Observatory

The Udaipur Solar Observatory (USO) is in Udaipur, Rajasthan in India

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Neemach Mata Temple

Neemach Mata Temple is located on a hill on the banks of the Fateh

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Ahar Cenotaphs

The Ahar Cenotaphs are a group of royal cenotaphs located in Ahar,

अशीच पर्यटकांची आकर्षणे

सर्व पाहा सर्व पाहा
विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Łazienki Palace

The Łazienki Palace (Шаблон:IPA-pl; Baths Palace; polski. Pałac

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Nymphenburg Palace

The Nymphenburg Palace (German: Schloss Nymphenburg), i.e. 'Nymph's

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Wilanów Palace

Wilanów Palace (Polish: Pałac w Wilanowie; Pałac Wilanowski) in Wi

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
El Escorial

El Escorial is an historical residence of the king of Spain. It is one

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Royal Pavilion

The Royal Pavilion is a former royal residence located in Brighton,

सर्व समान ठिकाणे पहा