एव्हरेस्ट

माउंट एव्हरेस्ट जगातील सर्वात उंच पर्वत आहे. या शिखराची उंची ८,८४८ मीटर (२९,०२९ फूट) इतकी असून नेपाळ व चीन (तिबेट)यांच्या सीमेवर आहे. नेपाळमध्ये याला सागरमाथा म्हणून ओळखतात तर तिबेट मध्ये .

वरून एव्हरेस्ट]] सन १८५६ मध्ये ब्रिटीश राजमधील भारतीय सर्वेक्षण विभागाने घेतलेल्या त्रिमितीय सर्वेक्षणामध्ये या शिखराची उंची २९,०२९ फूट इतकी निश्चित करण्यात आली. या आगोदर हे शिखर पीक XV या नावाने ओळखले जात होते. १९६५ मध्ये रॉयल जिओग्राफिकल सोसायटीने याचे अँड्रू वॉ यांच्या शिफारसीनुसार याचे नामकरण माउंट एव्हरेस्ट असे करण्यात आले. माउंट एव्हरेस्ट हा जगातील सर्वात उंच पर्वत असल्याने जगातील सर्वच गिर्यारोहकांचे याला सर करण्याचे स्वप्न असते. अनेक गिर्यारोहक भरमसाठ किंमत मोजून (अंदाजे २५ हजार डॉलर प्रत्येकी )हे शिखर सर करण्याचा प्रयत्न करतात. माउंट एव्हरेस्ट हे अतिउंचीचे शिखर असले तरी के२ अथवा कांचनगंगा या इतर शिखरांपेक्षा तुलनेने कमी अवघड आहे. इतर कोणत्याही ८००० मीटरपेक्षा उंची शिखरामध्ये या शिखरावर सर्वाधिक चढाया झाल्या आहेत. तरीही अतिउंचीच्या त्रासामुळे खराब हवामानामुळे अनेक गिर्यारोहक म्रुत्युमुखी पडतात. या शिखरावर पहीली चढाई १९५३ मध्ये ब्रिटीश मोहिमेतील न्यूझीलंडचे एंडमंड हिलरी व भारतीय-नेपाळी नागरिक शेर्पा तेन्झिंग नोर्गे यांनी केली. त्यानंतर आजवर ३,६७९ चढाया २,४३६ गिर्यारोहकांकडून झाल्या आहेत.

नाव

नेपाळी भाषेत एव्हरेस्टचे नाव सागरमाथा असे आहे व तिबेटियन भाषेत त्याला चोमोलुंग्मा ( विश्वाची माता) असे आहे. चीनी भाषेत Zhūmùlǎngmǎ Fēng (珠穆朗玛峰)असे आहे.

सर जॉर्ज एव्हरेस्ट हे १८४० मध्ये ब्रिटीश सरकारतर्फे भारतात चालू असलेल्या अखिल भारतीय त्रिमितीय सर्वेक्षण प्रकल्पाचे प्रमुख होते. एव्हरेस्ट यांनी १८४१ मध्ये या पर्वत रांगांना अतिउंच रांगांमध्ये समाविष्ट करण्यात आले. पहिल्या प्रथम याला पिक बी असे नामकरण केले. १८४८ मध्ये मोजणीचे काम पुढे सरकल्यावर याचे पिक XV असे नामकरण केले. कांचनगंगा पर्वताला तोवर सर्वात उंच शिखर मानण्यात येत होते. अँड्रू वॉ यांनी उपकरणांनी याच्या उंचीची मोजणी केली व त्यानंतर १८५२ मध्ये डेहराडून व कोलकातामधील कार्यालयांनी गणिते केल्यावर पिक XV ची उंची इतर कोणत्याही शिखरापेक्षा जास्त आढळली व याचे सर्वोच्च शिखर म्हणून शिक्कामोर्तब झाले. १८५६ मध्ये याला एव्हरेस्ट यांच्या सहका-यांकडून या शिखराचे नामकरण माउंट एव्हरेस्ट करण्यात यावे अशी मागणी केली.

चीन, तिबेट व नेपाळ यांनी आपापल्या परिने एव्हरेस्ट ला फक्त त्यांच्या नावाने संबोधले जावे असे प्रयत्न केले. परंतु इतर सर्व देशात शिखराला एव्हरेस्ट याच नावाने ओळखले जाते.

चढाईसाठी रस्ते

<imagemap> Image:Himalaya_annotated.jpg|thumb|250px|left|अंतराळातून घेतलेल्या छायाचित्रात दक्षिणेकडील व उत्तरेकडील मार्ग अधोरेखित केला आहे. rect 58 14 160 49 Chomo Lonzo rect 200 28 335 52 Makalu rect 378 24 566 45 Mount Everest rect 188 581 920 656 Tibetan Plateau rect 250 406 340 427 Rong River rect 333 149 409 186 Changtse rect 550 284 677 303 Rongbuk Glacier rect 478 196 570 218 North Face rect 237 231 346 267 East Rongbuk Glacier rect 314 290 536 309 North Col north ridge route rect 531 79 663 105 Lhotse rect 582 112 711 130 Nuptse rect 603 232 733 254 South Col route rect 716 165 839 206 Gyachung Kang rect 882 147 967 183 Cho Oyu rect 1 1 999 661

desc bottom-left </imagemap>

मां. एव्हरेस्ट वर चढाईसाठी दोन प्रमुख मार्ग आहेत. आग्नेयेकडील पर्वत रांग जी नेपाळच्या हद्दीत आहे व इशान्येकडील रांग जी तिबेटमधून येते. या व्यतीरिक्त अजूनही मार्ग आहेत परंतु ते फारसे वापरले जात नाहीत. या दोघां मार्गांपैकी आग्नेयेकडील मार्ग जास्ती सोपा व सोयीस्कर आहे. त्यामुळेच गिर्यारोहकांच्या जास्ती पसंतीचा आहे. ह्याच मार्गाने सर एडमंड हिलरी व तेन्झिंग नोर्गे यांनी १९५३ मध्ये पहिली चढाई केली होती. चीनचे पाश्चिमात्य देशांशी कटू संबंध यामुळे देखील नेपाळ मार्गाचा जास्त वापर होतो.

चढाई साठी सर्वोत्तम महिना मे हा गणला जातो. या काळात थंडी कमी झालेली असते. हिवाळ्यानंतरचा कडक बर्फ भरपूर असतो जे चढाईसाठी आवश्यक आहे. तसेच हवामानातील बदलामुळे वार्‍याची दिशा उत्तरेकडे होते व त्यामुळे पर्वतावरील सोसाट्याचा वारा कमी होतो. काहीवेळा मान्सूननंतरच्या काळात चढाईचे प्रयत्न होतात परंतु. सोसाट्याचा वारा, मान्सूनमुळे पडलेला जास्तीचा व भुशभुशीत बर्फ व हवामानातील सातत्याचे बिघाड यामुळे चढाई अवघड होउन बसते.

चढाया

सुरुवातीचे प्रयत्न

]] सन १८८५ मध्ये अल्पाईन क्लबचे अध्यक्ष क्लिंटन थॉमस डेंट यांनी आपल्या पुस्तकात अबाव्ह द स्नो लाइन या पुस्तकात एव्हरेस्टवर चढाईकरणे शक्य आहे हे नमूद केले होते.

जॉर्ज मॅलोरी यांनी १९२१ मध्ये उत्तरेकडील मार्गाचा शोध लावला. ही एव्हरेस्ट काबीज करायची मोहिम नव्हती तर एव्हरेस्ट चढण्याचे मार्ग कुठून असण्याची शक्यता आहे हे पडताळण्यास होती. मॅलोरी यांनी आपल्या शोधाकार्यात पार एव्हरेस्ट च्या सोंडांपर्यंत पोहोचण्यात यश मिळवले. मॅलोरी हे पहिले व्याक्ती होते ज्यांनी नॉर्थ कोल (७००७ मी) वर पाउल ठेवले. नॉर्थ कोलवरुन त्यांनी पुढील रस्ता कसा असेल याची पडताळणी केली. त्यांची मोहिमा इतक्या उंची साठी अद्ययावत नव्हती त्यामुळे त्यांना तेथून आवरते घ्यावे लागले.

पुढच्याच वर्षी सन १९२२२ मध्ये ब्रिटीशांनी एव्हरेस्ट काबीज करायची मोहिम् आखली.या मोहिमेत जॉर्ज फिंच यांनी भराभर चढत ८००० मीटर पेक्षाही जास्त चढण केली व ८००० मीटरपेक्षा चढाई करणारे पहिले व्यक्ती बनले. ही मोहिम जॉर्ज मॅलोरी व ब्रिटीशांच्या अखिलाडू वृती साठी गाजली. मॅलोरी व कर्नल फेलिक्स यांनी पुन्हा एकदा नॉर्थ कोलच्या बाजूने प्रयत्न केला. मॅलो‍री यांच्या चुकीमुळे हिमस्खलनामध्ये ७ स्थानिक वाहक मारले गेले.

१९२४ मध्ये मॅलोरी यांनी पुन्हा ब्रिटीश मोहिम आखली. या मोहिमेत सुरुवातील मॅलोरी व ब्रुस यांचे प्रयत्न खराब हवामानाने फोल ठरवले. पुढील प्रयत्न नॉर्टन व सॉमरवेल यांनी केले त्यांना सुरेख हवामानाची साथ मिळाली व त्यांनी विना ऑक्सिजन प्रयत्न केले. नॉर्टन ८५५८ मीटर पोहोचले असताना मॅलोरी व इर्व्हिन ह्यानी ऑक्सिजन देण्यासाठी म्हणून पुढाकार घेतला. नॉर्टनला बेसकँप कडे परत पाठवले व स्वता: मोहिमे फत्ते करायची ठरवले. ८ जून १९२४ रोजी इर्व्हिन व मॅलोरी चढाई करत असताना मरण पावले. १ मे १९९९ रोजी मॅलोरी व इर्व्हिन फाउंडेशनच्या गिर्यारोहकांनी एव्हरेस्ट शिखराच्या उत्तर बाजूला बर्फाच्या अस्तराखाली दफन झालेले मृतदेह शोधून काढण्यात यश मिळाले. शिखराच्या एवढे जवळ सापडलेले मृतदेहांमुळे इर्व्हिन व मॅलोरी यांनी हिलरी व नोर्गेच्या २४ वर्षे आगोदरच यांनी एव्हरेस्ट सर केले होते की काय अश्या चर्चांना उधाण आले. परंतु त्या मोहिमेतील सहका-यांचे मत व ज्या परिस्थितीत मृतदेह सापडले त्यावरुन त्यांना शिखर सर करण्यात अपयश आले असे बहुतेकांचे मत आहे.

१९५२ मध्ये स्वीस संघाने शर्थीचे प्रयत्न केले या मोहिमेचे नेतृत्व एडवर्ड डुनाँ यांनी केले होते. डुनाँ यांना नेपाळकडून चढाईची परवानगी मिळाली होती. त्यांनी खूंबू हिमनदी मधून साउथ कोल Шаблон:Convert उंचावर पोहोचण्याचा मार्ग शोधून काढला. या मोहिमेत रेमंड लँबर्ट व शेर्पा तेन्झिंग नोर्गे यांनी Шаблон:Convert इतकी उंची गाठली जो नवा विक्रम होता. स्वीस संघाला आल्पस मधील अनुभवाचा चांगलाच फायदा झाला तसेच त्यांचे शेर्पाशी वर्तन अतिशय खेळिमेळीचे असायचे यामुळे स्वीस संघाला पुर्वीच्या ब्रिटीश संघांपेक्षा चांगले यश मिळाले.

तेन्झिंग नोर्गे व हिलरींचे पहिले पाउल

१९५३ मध्ये ९ वी ब्रिटीश मोहिम आखली गेली. या मोहिमेचे नेतृत्व अनुभवी ब्रिटीश अधिकारी जॉन हंट यांच्या कडे होते. यांनी पुर्वीच्या स्वीस मोहिमेच्या अनुभवाचा पुरेपूर फायदा उठवायचे ठरवले. तेन्झिंग नोर्गे याला त्या अंतर्गत मोहिमेत समाविष्ट करण्यात आले. हंट यांनी गिर्यारोहकांच्या दोन जोड्या बनवल्या. पहिली जोडी टॉम बॉर्डिलॉन व चार्ल्स इव्हान यांनी चढाईचे शर्थीचे प्रयत्न केले शिखरापासून १०० मीटर पर्यंत पोहोचण्यात २६ मे रोजी त्यांना यश मिळाले परंतु तोवर त्यांची फारच दमवणूक झाली होती. परंतु त्यांनी बर्फात खोदलेले मार्ग, दोर व नेलेले ऑक्सिजनच्या नळकांड्या याचा फायद तेन्झिंग नोर्गे व न्यूझीलंडचे एडमंड हिलरी या जोडीला झाला. दोनच दिवसांनी नोर्गे व हिलरी या जोडीने शिखरावर साउथ कोलच्या दिशेने कूच केले. २९ मे १९५३ रोजी सकाळी ११ वाजता सरतेशेवटी एव्हरेस्टवर मानवी पाउल पडले. पहिले एव्हरेस्टवर कोण पोहोचले याचे हिलरी व नोर्गे जोडिने बरीच वर्षे गुपीत कायम ठेवले होते. तेन्झिंग नोर्गेने आपण हिलरी नंतर पोहोचल्याचे काही काळाने मान्य केले.. शिखरावर हिलरी यांनी फोटो काढले व जोडीने मिठाई खाउन आनंद साजरा केला.

एव्हरेस्ट सर केल्याची बातमी लंडनला राणी एलिझाबेथ यांच्या राज्याभिषेकाच्या दिवशी पोहोचली. एव्हरेस्ट सर केल्यामुळे मुळे ब्रिटीश संघाचे नेते जॉन हंट व हिलरी यांना सर किताबाने सन्मानित करण्यात आले. तेन्झिंग नोर्गे यांना जॉर्ज मेडलने सन्मानित करण्यात आले. तर हिलरी यांना न्यूझिलंडचा सर्वोच्च पुरस्कार ऑर्डर ऑफ न्यूझिलंड मिळाला. ऑर्डर ऑफ न्यूझिलंड मिळणारे हिलरी हे पहिले नागरिक होते. तेन्झिंग नोर्गे यांना भारत सरकारचेही पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

विना ऑक्सिजनचे प्रयत्न

८ मे १९७८ रोजी इटलीचे प्रसिद्ध गिर्यारोहक राईनहार्ड मेसनर यांनी ऑस्ट्रीयाच्या पेतर हेबलर यांच्या साथीत एव्हरेस्टवर चढाई केली. या चढाईत कोणत्याही प्रकारच्या ऑक्सिजनच्या नळकांड्यांचा वापर करण्यात आला नाही. राईनहार्ड मेसनर यांनी पुन्हा १९८० मध्ये एव्हरेस्ट वर पुन्हा एकदा विनाऑक्सिजन एकट्याने चढाई केली.

भारतीय चढाया

पाश्चिमात्य देशांप्रमाणेच भारतातही गिर्यारोहकांचे एव्हरेस्टवर चढाई करण्याचे स्वप्न असते. परंतु बहुतेकांना जबर खर्चामुळे ते परवडत नाही .जरी एव्हरेस्ट हे भारतातले शिखर नसले व खर्च अति असला तरी भारतीयांनी केलेल्या चढायांची संख्या लाक्षणीय आहे. तेन्झिंग नोर्गे जे पहिले चढाई करणारे होते त्यानी नंतरच्या काळात भारतीय नागरिकत्व घेतले होते. त्यानंतरच्या बहुतांशी भारतीय चढाया ह्या भारतीय सैन्यदला तर्फे आखल्या गेल्या. पहिली भारतीय मोहिम १९६० मध्ये राबवली गेली. या मोहिमेचे नेतृत्व ब्रिगेडियर जी. सिंग यांच्याकडे होते. परंतु पहिले यश १९६५ मधील तिसर्‍या मोहिमेत मिळाले.१९८४ मधील नागरी मोहिमेत बचेद्रींपाल ह्या एव्हरेस्ट सर करणार्या भारताच्या पहिल्या महिला गिर्यारोहक झाल्या. त्यानंतरही अनेक भारतीय महिलांनी एव्हरेस्ट सर करण्यात यश मिळवले आहे.

मराठी पाऊल

१९ मे १९९८ रोजी पुण्याचे सुरेंद्र चव्हाण यांनी एव्हरेस्टवर यशस्वी चढाई केली. भारतीय पथकाचे नेतृत्व करताना सुरेंद्र चव्हाण यांना १९९८ मध्ये मोसमातील पहिल्या चढाईचा मान मिळवला. यापूर्वी २ मे १९९२ रोजी डॉ दिपक कुलकर्णी यांना चढाई करताना मरण आले .

महत्त्वाच्या घडामोडी

१९९६ मधील दुर्घटना

एव्हरेस्टवर १९९६ च्या चढाईच्या मोसमात एकूण १५ गिर्यारोहकांचा म्रुत्यू झाला व गिर्यारोहकांसाठी सर्वात भयानक वर्ष अशी नोंद झाली. त्यातील ११ मे रोजी सर्वाधिक ८ जण मरण पावले. या घटनेचे मोठ्या प्रमाणावर पडसाद उमटले, भारतातही बातम्यां व वृतपत्रात हा विषय चांगलाच गाजला व एकूणच एव्हरेस्टवर चढाईसाठी व नाव कमवण्यासाठी गिर्यारोहकांकडून हलगर्जी होत असल्याचा दावा करण्यात आला. तसेच नेपाळ सरकारवरही एव्हरेस्टच्या मोहिमांचे बाजारीकरण केल्याचा आरोप ठेवण्यात आला. एव्हरेस्टवर चढाईसाठी पात्रता निकष कडक करण्याची सार्वत्रिक मागणी झाली.

मे २००४ मध्ये कॅनडामधील टोरोंटो विद्यापीठातील डॉ केंट मूर व जॉन सेंपल यांनी अभ्यासाअंती असा निष्कर्ष काढला की, ११ मे १९९६ रोजी एव्हरेस्ट परिसरात अत्यंत विचित्र हवामान निर्माण झाले होते ज्यामुळे त्या उंचीवरील ऑक्सिजन अजून विरळ झाला होता, ऑक्सिजनची पातळी १४ % पेक्षाही खाली आली होती या हवामानात प्राणहानी होणे शक्य असते.

हे पहा

एव्हरेस्ट संबधित साहित्य

बाह्य दुवे

Listed in the following categories:
एक टिप्पणी पोस्ट करा
टिपा आणि इशारे
द्वारा व्यवस्था करा:
Nepal Planet Treks
4 September 2017
merupakan gunung tertinggi di dunia dengan ketinggian setinggi 8850 meter. Gunung Everest terletak di banjaran gunung Himalaya. Everest adalah gunung tertinggi di bumi (diukur dari paras laut). Rabung kemuncak gunung menandakan sempadan antara Nepal dan Tibet. Di Nepali gunung tersebut dikenali sebagai Sagarmatha (Sanskrit untuk "dahi langit") dan di Tibetan Chomolangma atau Qomolangma ("ibu alam"), yang diambil dari nama Cina 珠穆朗玛峰 (pinyin: Zhūmùlǎngmǎ Fēng). Walaupun ia dinamakan Everest oleh Sir Andrew Waugh, jeneral peninjau British di India, sebagai penghormatan kepada yang sebelumnya Sir George Everest, sebutan popular Everest (Ev-er-est) berbeza dangan sebutan Sir George mengenai nama akhirnya (Eve-rest). Radhanath Sikdar, juru ukur dan pakar matematik dari Bengal, merupakan orang yang pertama mengenal pasti Everest sebagai kemuncak tertinggi melalui kiraan trigonometri, pada 1852. Sesetengah rakyat India percaya bahawa puncak tersebut sepatutnya dinamakan menurut Sikdar, bukannya Everest. Gunung ini dianggarkan 8,850 m (29,035 kaki; hampir 5.5 batu) tinggi, walaupun terdapat variasi daripada segi ukuran (kerajaan Nepal tidak mengesahkan ukuran ini secara rasmi, ketinggian Everest masih dianggap 8,848 m). Ia pertama kali diukur pada tahun 1856 sebagai mempunyai ketinggian 29,000 kaki, tetapi diisytiharkan sebagai 29,002 kaki tinggi. Tambahan secara rawak 2 kaki menunjukkan perasaan masa itu bahawa ketinggian tepat 29,000 kaki akan dianggap sebagai anggaran yang dibulatkan. Masa kini anggaran umum yang diterima pakai adalah 8850 m yang diperolehi melalui bacaan Sistem Kedudukan Sejagat (GPS). Everest masih meningkat akibat pergerakan plat tektonik kawasan tersebut; bagaimanapun, kesan itu hanya ketara pada skala masa geologi. Secara tepat, Everest adalah gunung yang kemuncaknya mencapai jarak paling luas di atas paras laut. Dua gunung lain yang kadang-kala didakwa sebagai "gunung tertinggi di dunia"ialah Mauna Loa di Hawaii ialah paling tertinggi apabila diukur dari dasarnya pada dasar tengah laut, tetapi hanya mencapai ketinggian 4,170 m (13,680 kaki) atas paras laut dan kemuncak Gunung Chimborazo di Ecuador adalah 2,150 m lebih dari pusat bumi berbanding Everest, kerana Bumi agak berisi dikawasan Khatulistiwa. Bagaimanapun, Chimborazo hanya mencapai ketinggian 6,272 m atas paras laut, yang menurut kriteria bukan juga kemuncak tertinggi di Andes. Lebih menarik, dasar terdalam di lautan adalah lebih dalam berbanding ketinggian Everest: Challenger Deep, terletak di Parit Mariana, begitu dalam sehinggakan sekiranya gunung Everest diletakkan di dalamnya, masih terdapat hampir satu batu air menutupinya. http://www.nepalguideinfo.com/everest-base-camp-trek/ http://www.nepalplanettreks.com Nepal Mounatin Guide TeamS (Nepal Planet Treks and Expedition Pvt. Ltd.) GPO: 4453 Paknajol ,Thamel, Kathmandu, Nepal Phone: +977-1-4252196 Mobile: +977-9841613822 (Sanjib) Fax: +977-1-4252196 Email: [email protected]
added at 03.07: Lebih menarik, dasar terdalam di lautan adalah lebih dalam berbanding ketinggian Everest: Challenger Deep, terletak di Parit Mariana, begitu dalam sehinggakan sekiranya gunung Everest diletakkan di dalamnya, masih terdapat hampir satu batu air menutupinya. http://www.nepalguideinfo.com/everest-base-camp-trek/ http://www.nepalplanettreks.com Nepal Mounatin Guide TeamS (Nepal Planet Treks and Expedition Pvt. Ltd.) GPO: 4453 Paknajol ,Thamel, Kathmandu, Nepal Phone: +977-1-4252196 Mobile: +977-9841613822 (Sanjib) Fax: +977-1-4252196 Email: [email protected]
added at 03.07:
Andrew 翁 Òng
12 September 2015
My Great Salute to those previous successful Everest conquerors & Respect to those climbers who died somewhere at this famous peak
Isadore Calderon
27 January 2013
Climb Mt. Everest.- Kathmandu, Nepal Once the domain only of the most seasoned mountaineers, Everest today is accessible to people from all walks of life.
Tenzin Woaber
28 September 2014
Take it easy... Let ur body make adjustment to the altitude before doing any thing physical challenging... Remember it's at more the 5000 meters above sea level
Andrew 翁 Òng
12 September 2015
Freezing cold... Superb amazed on the peak of the World
Malcolm MacDonald
6 March 2013
This is a tall mountain.
Artyom Fedosov
24 July 2014
The highest summit in Asia and around the world. Elevation — 8,848 m.
8.0/10
GenBaba$™⚽️ आणि 79,682 अधिक लोक येथे आहेत
नकाशा
1.9km from Hornbein Couloir, Shigatse, नेपाल दिशानिर्देश मिळवा
Mon-Sun 24 Hours

Mount Everest रोजी Foursquare

एव्हरेस्ट रोजी Facebook

Everest Summit Lodge - Pangboche

प्रारंभ करत आहे $249

Everest Summit Lodge - Tashinga

प्रारंभ करत आहे $220

Yeti Mountain Home Namche

प्रारंभ करत आहे $155

Everest Summit Lodge - Mende

प्रारंभ करत आहे $220

Yeti Mountain Home Thame

प्रारंभ करत आहे $155

Hotel Khangri - Namche

प्रारंभ करत आहे $7

जवळपास शिफारस केलेल्या दृष्टी

सर्व पाहा सर्व पाहा
विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
ल्होत्से

लोत्से - उंची ८५८६ मी. - पृथ्वीवर एक उंच पर्वत.

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Nuptse

Nuptse is a mountain in the Khumbu region of the Mahalangur Himal, in

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Imja Tse

Imja Tse, better known as Island Peak, is a mountain in the Himalayas

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
मकालू

मकालू हे हिमालयातील एक शिखर आहे. त्याची उंची ८४६३ मीटर असून

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
सगरमाथा राष्ट्रीय उद्यान

सगरमाथा राष्ट्रीय उद्यान (नेपाळी:सगरमाथा राष्ट्रीय निकुंज) हा नेपाळम

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Gokyo Ri

Gokyo Ri, aka Gokyo Peak (5357m, 17 575ft above sea level) is a peak

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
चो ओयु

चो ओयु - उंची ८,१८८ मी. - पृथ्वीवर एक उंच पर्वत.

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Ama Dablam

Ama Dablam is a mountain in the Himalaya range of eastern Nepal. The

अशीच पर्यटकांची आकर्षणे

सर्व पाहा सर्व पाहा
विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
मौना किया

मौना किया हवाई बेटावरील एक सुप्त ज्वालामुखी आहे. त्याच्या शिखराची समुद

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
फूजी पर्वत

फूजी पर्वत center}} फू

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Adam's Peak

Adam's Peak (also Adam's Mount; Sinhalese Samanalakanda 'butterfly

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Mount Qingcheng

Mount Qingcheng (Шаблон:Zh-cp) is a mountain in Dujiangyan, Sichu

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
कांचनगंगा

कांचनगंगा हे हिमालयातले एक पर्वतशिखर आहे. हे जगातील तिसरे सर्वात

सर्व समान ठिकाणे पहा