गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळ

गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळ किंवा दाभोळी विमानतळ (Dabolim) (आहसंवि: GOI, आप्रविको: VAGO) हा भारताच्या गोवा राज्यातील वास्को द गामा येथे असलेला विमानतळ आहे.

इतिहास

हा विमानतळ भारतातील पोर्तुगीज सरकारने १९५०च्या दशकात बांधला. २४९ एकर जमिनीवर असलेला हा विमानतळ १९६१पर्यंत त्रांसपोर्तेस एरिओस दा इंदिया पोर्तुगेसा या विमानकंपनीचा मुख्य तळ होता. येथून कराची, मोझांबिक आणि तिमोरसह अनेक ठिकाणी विमानसेवा उपलब्ध होती. येथून भारतातील इतर भागांत विमानोड्डाणे होत नसत. गोवा मुक्तिसंग्रामादरम्यान भारतीय वायुसेनेने या विमानतळावर बॉम्बफेक करून हा तळ जवळजवळ निकामी करुन टाकला होता. त्यावेळी येथे असलेली दोन प्रवासी विमाने कशीबशी कराचीला निसटली. त्यानंतर हा तळ भारतीय नौसेनेच्या वायुविभागाने काबीज केला. एप्रिल १९६२मध्ये मेजर जनरल के.पी. चांदेथने हा तळ गोव्यातील इतर मालमत्तेसह भारतीय नौसेनेच्या हवाली केला.

पुढील काही वर्षे दुरावस्थेत असलेला हा विमानतळ १९६६च्या सुमारास दुरुस्त केला गेला व येथील धावपट्टीवर जेट विमानेही उतरताय येईल अशी तरतूद केली गेली. भारत सरकारने इंडियन एअरलाइन्सला येथून विमानसेवा सुरू करण्यास सांगितले व पहिल्यांदाच गोव्यातून देशांतर्गत विमानसेवा उपलब्ध झाली. १९८०च्या सुमारास जुआरी व मांडवी या नद्यांवर मोठे पूल झाल्याने वास्को आणि गोव्यातील इतर ठिकाणांतील अंतर कमी झाले. तसेच १९८३मध्ये कॉमनवेल्थ हेड्स ऑफ गव्हर्नमेंट्सची मीटिंग (चोगॅम) गोव्यात भरण्ली. या वेळी गोव्याला व पर्यायाने दाभोळी विमानतळावर येणार्‍या विमानांत एकदम मोठी वाढ झाली. यामुळे प्रसिद्धी मिळत असलेल्या दाभोळी विमानतळावर अनेक चार्टर सेवा सुरू झाल्या. यांत जर्मनीची काँडोर एअरलाइन्स ही कंपनी अग्रेसर होती. आजमितीस भारतात येणार्‍या एकूण चार्टर्ड विमानांपैकी ९०% म्हणजे अंदाजे ७०० विमाने दाभोळी विमानतळावर येतात. यांतून दीड ते दोन लाख प्रवासी गोव्याला येत असल्याचा अंदाज आहे. याशिवाय तितकेच प्रवासी इतर विमान कंपन्यांच्या विमानांतून येतात. भारतातील एकूण विदेशी पाहुण्यांपैकी ५-१०% पाहुणे दाभोळी विमानतळातून येतात आणि देशात खर्च होणार्‍या विदेशी चलनाचा १०-१५% रक्कम हे प्रवासी खर्च करीत असतात. २००७-०८च्या मोसमात केवळ युनायटेड किंग्डममधून एक लाख तर रशियातून ४२,००० प्रवासी चार्टर्ड विमानांतून दाभोळीस आले.

इमारत आणि सुविधा

दाभोळी विमानतळाची व्याप्ती अंदाजे ६८८-७४५ हेक्टर आहे. विमानतळ नौसेनेच्या आधिपत्याखाली असून त्यातच १४ हेक्टरचा नागरी आंक्लेव्ह[मराठी शब्द सुचवा] आहे. या भागावर भारतीय विमानतळ प्राधिकरणाची सत्ता आहे. यात १२,००० मी२ क्षेत्रफळ असलेल्या दोन टर्मिनल इमारती आहेत. त्यांपैकी एक देशांतर्गत वाहतुकीसाठी तर दुसरी आंतरराष्ट्रीय विमानसेवांसाठी आहे. अंतर्गत वाहतुकीचे टर्मिनल १९८३मध्ये बांधलेले आहे आणि तेथून एका वेळी ३५० प्रवासी येजा करू शकतात तर १९९६मध्ये बांधलेले आंतरराष्ट्रीय टर्मिनल एकावेळी २५० प्रवासी हाताळू शकते. येथील सुरक्षेसाठी अंदाजे २५० निमलष्करी सैनिक तैनात असतात. विमानतळाबाहेर ८४ मोटारी आणि आठ बसेस पार्क करण्याची सोय आहे.

दाभोळी विमानतळावरुन रोज अंदाजे ३०-४० विमाने येतात-जातात. नौसेनेने घातलेल्या निर्बंधांमुळे यांतील बहुतांश उड्डाणे सोमवार-शुक्रवारी दुपारी १ ते ६ च्या दरम्यान असतात तर उरलेल्यांपैकी बरीचशी उड्डाणे पहाटे असतात. इतर वेळात नौसेनेचे वैमानिक आपल्या लढाऊ विमानांवर सराव करीत असतात. रात्रीच्या विमानोड्डाणांवर निर्बंध असला तरी नौसेनेच्या परवानगीने अधूनमधून अशी उड्डाणे होत असतात. हिवाळ्यात, विशेषतः नाताळ व नववर्षाच्या आसपास येथून सर्वाधिक उड्डाणे होतात. यामुळे या कालखंडात दाभोळीस येण्या-जाण्याची तिकिटे महाग असतात. या काळातील येथून दिल्ली किंवा मुंबईची तिकिटे मुंबई-दुबई किंवा मुंबई-बँगकॉकच्या तिकिटांच्या पातळीची असतात.

येथील धावपट्टीच्या दोन्ही बाजूस नौसेनेच्या सुविधा आहेत. यामुळे धावपट्टीवरून सैनिक चालत किंवा सायकलींवरुन धावपट्टी ओलांडणे हे नेहमी होत असते. या विमानतळाजवळ नौसेनेचे ६,००० सैनिक-कर्मचारी आहेत तर अधिक ४,००० गोवा पोलिसदलाचे कर्मचारीही येथे तैनात आहेत.

स्थानिक दळणवळण

गोव्यातून दाबोळी विमानतळावर जाण्यासाठी बस, ट्रेन, कार, टॅक्सी, इ. साधने वापरता येतात. वास्कोपासून चिखली मार्गे बससेवा आहे. वास्को हे सगळ्यात जवळचे रेल्वे स्थानक तर मुरगाव हे सगळ्यात जवळचे बंदर आहे. वास्कोपासून कोंकण रेल्वेद्वारे गोव्यातील तसेच भारतात इतर ठिकाणी जाण्यासाठी रेल्वेसेवा उपलब्ध आहे.

विस्तार

नवीन विस्तारित टर्मिनलचे बांधकाम फेब्रुवारी २१, इ.स. २००९ रोजी सुरू झाले होते. त्यामुळे आरमार व नागरी विमान दळणवळण एकाच वेळी होणे शक्य झाले आहे. याशिवाय येथे बारा विमाने रात्रभर थांबण्यासाठी जागा, एरोब्रिज, दोन टॅक्सीमार्ग, कार पार्किंग आणि विद्युत उपकेंद्र बांधले आहे..

टर्मिनल

टर्मिनल १ - देशांतर्गत

दाभोळी देशातील १३२पैकी दहा विमानतळांशी विमानसेवेने जोडलेले आहे.

टर्मिनल २ - आंतरराष्ट्रीय

येथून मुख्यत्वे इराणच्या आखातात आंतरराष्ट्रीय विमानसेवा उपलब्ध आहे. सध्या फक्त एअर इंडिया आणि इंडियन या कंपन्यांना ही सेवा पुरवण्यास मुभा आहे परंतु परदेशी विमानकंपन्यांना परवानगी मिळण्यास सुरुवात झाली आहे. अशा अनेक कंपन्या सध्या हिवाळ्यात दाभोळीस चार्टर विमानसेवा पुरवतात.

विमानसेवा व गंतव्यस्थान

विमान कंपनी गंतव्य स्थान टर्मिनल
एरोफ्लोट मॉस्को (हिवाळी सेवा)
एअर अरेबिया शारजा
आर इटली पोलास्का वॉर्सॉ (चार्टर सेवा)
आर्कफ्लाय ॲम्स्टरडॅम (चार्टर सेवा)
काँडोर फ्रांकफुर्ट
एडेलवाइस एर झुरिक (चार्टर सेवा)
गोएर दिल्ली, मुंबई
इंडियन एअरलाइन्स दिल्ली, मुंबई
इंडियन आरलाइन्स बंगळूर, चेन्नई, दुबई, कुवैत
ईंडिगो दिल्ली, मुंबई
जेट एरवेझ बंगळूर, हैदराबाद, मुंबई
जेट लाईट अमदावाद, दिल्ली, मुंबई
किंगफिशर एरलाइन्स बंगळूर, दिल्ली, हैदराबाद, इंदूर, कोलकाता, मुंबई, नागपूर, पुणे, श्रीनगर
एमडीएलआर एरलाइन्स दिल्ली
मोनार्क एरलाइन्स लंडन-गॅटविक, मँचेस्टर (चार्टर सेवा)
नोव्हएअर ग्योटेबोर्ग, ऑस्लो, स्टॉकहोम
पॅरामाउंट एरवेझ चेन्नई, कोची, तिरुवअनंतपुरम
कतार एअरवेज दोहा
स्पाईसजेट अमदावाद, बंगळूर, दिल्ली, हैदराबाद, जयपूर, कोलकाता, मुंबई
थॉमस कूक एअरलाइन्स लंडन-गॅटविक, मँचेस्टर (चार्टर सेवा)
थॉमसन एअरवेज ईस्ट मिडलँड्स, लंडन-गॅटविक, मँचेस्टर (चार्टर सेवा)
ट्रांसएरो मॉस्को-दोमोदेदोवो

सांख्यिकी

दाभोळी विमानतळाची सांख्यिकी[1]
वर्ष एकूण प्रवासी एकूण विमान आवागमनसंख्या
1999 758,914 7,584
2000 875,924 7,957
2001 791,628 8,112

सैनिकी विमान प्रशिक्षण

भारतीय आरमार दाभोळी विमानतळावरुन आठवड्यातील पाच दिवस सकाळी ०८:३० ते दुपारी १३:०० पर्यंत आपल्या वैमानिकांच्या प्रशिक्षणार्थ लढाऊ विमाने उडवते. या काळात प्रवासी विमानांना येण्या-जाण्यास परवानगी नसते. काही वेळेस चार्र्डर्डर सेवांना अपवाद म्हणून ही मुभा दिली जाते. गेल्या काही महिन्यांत आरमाराने हे नियम किंचित शिथिल केले आहेत.

विमानतळास नागरी विमानळ करण्यासाठीची चळवळ

गोव्यातील राजकारण्यांनी दाभोळीतील आरमारी तळ आय.एन.एस. कदंब येथे हलविण्याची मागणी वेळोवेळी केलेली आहे. हा नवीन तळ दाभोळीच्या दक्षिणेस ७० किमीवर कर्नाटकातील कारवार शहराजवळ आहे. भारतीय आरमाराने दाभोळीमध्ये ७५० कोटी रुपयांची गुंतवणूक केलेली असल्यामुळे हा तळ कारवारला नेणे शक्य व उचित नाही असे म्हट्ले गेले आहे.

२००७मध्ये भारतीय आरमार, भारतीय विमानतळ प्राधिकरण आणि कर्नाटक राज्य सरकारने कारवारमधील धावपट्टी २,५०० मी इतकी लांब करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. यासाठी ७५ हेक्टर जमीन संपादन करण्याचाही विचार होता. या मोठ्या धावपट्टीवर एअरबस ए-३२० सारख्या विमानांना उतरणे शक्य असते. परंतु या प्रस्तावावर पुढे कार्यवाही झालेली नाही.

प्रस्तावित मोपा विमानतळ

नागरी विमान मंत्रालयाने उत्तर गोवा जिल्ह्यातील पेडणे तालुक्यात मोपा येथे नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ बांधण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. स्थानिक नागरिक तसेच गोव्यातील असंख्य नागरिकांचा या प्रकल्पाला विविध कारणांनी विरोध होत आहे. या संदर्भात घेण्यात आलेल्या जनसुनावण्यात सर्व बाजू मांडण्यात आल्या आहेत. प्रकल्प बाधित क्षेत्राचे पर्यावरणीय सर्वेक्षण अत्यंत चुकीचे केलेले असून या भागात मोठ्या प्रमाणावर वने, प्राणी व पाण्याचे स्रोत आहेत. या सर्व विरोधाला डावलून राज्य व केंद्र सरकारने सर्व परवानग्या देत कोणत्याही परिस्थितीत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे ठरवले आहे.

भारतीय आरमारी तळ

दाभोळी आरमारी वायुसेना तळ हा भारतीय वायुसेनेच्या कोइंबतूर जवळील सुलूर येथील तळाचा भाग असल्याचे मानले जाते. १९८३पासून आरमाराने आपली बी.ए.ई. सी हॅरियर प्रकारच्या विमानांची तुकडी येथे आणली व वैमानिक प्रशिक्षण केंद्रही उभारले. आय.एन.एस. विक्रमादित्य या नवीन विमानवाहू नौकेबरोबर विकत घेतलेल्या १२ मिग-२९के विमानांपैकी चार विमानांना दाभोळी येथे ठेवण्याचा बेत आहे. कारवार बंदरात असलेल्या विक्रमादित्यच्या डेकची प्रतिकृती दाभोळी येथे बांधण्यात येत आहे. विमानवाहू नौकेवर ये-जा करण्याचा सराव करण्यासाठी असलेल्या या धावपट्टीला २८३ मीटर लांबी असलेला १४.३ अंशाचा स्की-जंपसुद्धा आहे.

याशिवाय भारतीय आरमाराची कामोव्ह केए-२८ प्रकारची पाणबुडीविरोधी हेलिकॉप्टर, आयएल-१८, आयएल-३८ आणि टीयू-१४२एम प्रकारची विमाने दाभोळी विमानतळावर आहेत. भारतीय वायुसेनेची काही लढाऊ बाँबफेकी विमाने आणि भारतीय तटरक्षक सेना आपली डॉर्नियर प्रकारची विमाने दाभोळीस ठेवतात. ही विमाने किनार्‍याजवळील समुद्रात गस्त घालतात तर आरमाराची निःशस्त्र विमाने थेट आफ्रिकेच्या किनार्‍यापर्यंत टेहळणी करीत असतात. आरमारी वायुसेनेची किरण ही हवाई कसरती करणारी विमानेसुद्धा दाभोळीत आहेत. ही विमाने वर्षातून दोन वेळा १५-२० मिनिटांच्या कसरती गोव्यात करून दाखवतात. दाभोळी विमानतळावरच आरमारी वायुसेनेचे संग्रहालयही आहे.

माल वाहतूक

दाभोळी विमानतळावरुन प्रतिवर्षी अंदाजे ५,००० टन मालसामानाची वाहतूक होते. येथून मुख्यत्वे आखाती देशांत मासे, फळे, फुले व भाज्यांची निर्यात होते.

दाभोळी विमानतळावर झालेल्या दुर्घटना व अपघात

  • ऑक्टोबर १, इ.स. २००२ रोजी भारतीय आरमाराची दोन आयएल-१८ प्रकारची विमाने एकमेकांवर आदळली यात १२ सैनिकी कर्मचारी तर जमिनीवरील तीन व्यक्ती मृत्यू पावल्या.
  • डिसेंबर २००४मध्ये सी हॅरियर विमानाने उतरताना पलटी खाल्ली. वैमानिक बचावला होता.
  • डिसेंबर २००५मध्ये सीहॅरियर उतरत असताना धावपट्टी सोडून निर्बंधक, संरक्षक भिंत व एक रस्ता ओलांडून पुढे गेले. त्यानंतरच्या स्फोटात वैमानिक मृत्यू पावला.
  • डिसेंबर २४, २००७ रोजी सकाळी ११:१५ वाजता सी हॅरियर थेट खाली उतरण्याचा प्रयत्‍न करीत असताना पडले. वैमानिकाने आपला बचाव करून घेतला.

बाह्य दुवे

Listed in the following categories:
एक टिप्पणी पोस्ट करा
टिपा आणि इशारे
द्वारा व्यवस्था करा:
Christian Kloewer
15 December 2013
If the queue is very long, a bellman/baggage porter will carry your bags inside, skipping the line straight to x-ray scanning, for about 100Rs
Joscha Feth
22 September 2014
If you arrive late, don't let the official-looking taxi office inside fool you - there will be plenty cheaper options outside, no matter the time.
Edsil Coutinho
26 May 2013
Make sure you get to the airport 90 mins before flight time..Between the ques at the gate at screening at check in at rescreening..u definately all the time in the world
Kushal Sanghvi
17 November 2014
Now it's a great clean beach from what it used to be, best time still at 5 am morning or then after 9 at night
Ania Smoleń
12 October 2013
Go for a take away pizza hut before the security check. You can take it through all procedures and enjoy almost normal meal while waiting for your flight.
Pema Bhutia
18 October 2015
The new airport's great except for food choices. Also be prepared to walk a lot from your terminal to the plane/bus that's taking you to the plane. It's a never ending path.
Devasthali - The Valley of Gods Resort

प्रारंभ करत आहे $49

Bellanzo Premium Service Apartment

प्रारंभ करत आहे $38

OYO 2844 Dewa Goa Hotel

प्रारंभ करत आहे $39

Hotel Cliff

प्रारंभ करत आहे $58

Dewa Goa Apartment

प्रारंभ करत आहे $24

Villa Idalina

प्रारंभ करत आहे $179

जवळपास शिफारस केलेल्या दृष्टी

सर्व पाहा सर्व पाहा
विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Chapel of Jesus Nazareth

Chapel of Jesus Nazareth एक प्रेक्षणीय, Churches एक आहे Siridão

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Fort Aguada

Fort Aguada is a well-preserved seventeenth-century Portuguese fort

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Ramnathi

The temple of Ramnathi is located in Ramnathim, Bandivade in Goa.

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Basilica of Bom Jesus

The Basilica of Bom Jesus or Basilica of Good Jesus (Portuguese:

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Goa Velha

Goa Velha or Vhoddlem Gõi is a census town in North Goa district in

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Se Cathedral

Se Cathedral (Sé Cathedral of Santa Catarina) is a cathedral

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Chapora Fort

The Chapora Fort occupies an important position which, in every

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Arambol Beach

REDIRECT Arambol

अशीच पर्यटकांची आकर्षणे

सर्व पाहा सर्व पाहा
विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
सिंगापूर चांगी विमानतळ

सिंगापूर चांगी विमानतळ (IATA: SIN) सिंगापूरच्या चांगी भागात आहे. हा व

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
हमाद आंतरराष्ट्रीय विमानतळ

हमाद आंतरराष्ट्रीय विमानतळ (अरबी: مطار حمد الدولي‎‎)

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
इंचॉन आंतरराष्ट्रीय विमानतळ

इंचॉन आंतरराष्ट्रीय विमानतळ Шаблон:विमानतळ संकेत हा दक्

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
New Chitose Airport

New Chitose Airport (新千歳空港, Shin-Chitose Kūkō) (IATA: CTS, ICAO: RJCC)

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Antalya Airport

Antalya Airport Шаблон:Airport codes is Шаблон:Convert northeast o

सर्व समान ठिकाणे पहा