पिसाचा कलता मनोरा

पिसाचा कलता मनोरा (इटालियन: Torre pendente di Pisa) हा इटली देशाच्या पिसा शहरातील एक चर्चचा मनोरा आहे. इटलीमधील एक लोकप्रिय आकर्षण असलेला हा मनोरा गेले अनेक शतके एका बाजूला झुकलेल्या अवस्थेत आहे.

इ.स. ११७३ साली ह्या मरोऱ्याच्या बांधकामास प्रारंभ झाला. कमकुवत पाया, पायाखालील ठिसूळ जमीन इत्यादी कारणांमुळे ११७८ साली तीन मजले बांधून पूर्ण झाल्यानंतर हा मनोरा एका बाजूला कलण्यास सुरुवात झाली. व त्यानंतर मनोर्‍याचे काम थांबले. बोनॅनो पिझानो हा मनोर्‍याचा वास्तुरचनाकार होता आणि त्याचा मूळ आराखडा आठ मजल्यांचा आणि ५६ मीटर उंचीचा होता. तांत्रिक अडचणी, राजकीय अस्थैर्यामुळे थांबलेले मनोर्‍याचे काम १२७२ साली परत सुरू झाले आणि १२७८ मध्ये सात मजले पूर्ण झाले. या काळात चौथ्या मजल्यापासून वरचे मजले झुकावाच्या बाजूने अधिक उंचीचे बांधले गेले, पण झुकाव वाढतच राहिला. अखेरीस १३७० साली या मनोर्‍याचा आठवा मजला बांधून पूर्ण झाला. अशा रीतीने या कामाला दोन शतकांचा कालावधी लागला.

इ.स. १९३४ मध्ये इटालीचा सर्वेसर्वा बेनिटो मुसोलीनीने मनोर्‍याच्या पायात ३६१ मोठी छिद्रे पाडून त्यात सिमेंट ग्राऊटिंग इंजेक्ट करण्याचा प्रयोग करून बघितला. तरीही त्याचे कलणे वाढलेच आहे. आजपर्यंत मनोर्‍याचा झुकाव थांबण्यासाठी अनेक प्रकारचे तांत्रिक प्रयोग होऊनही मनोर्‍याचे कलणे वाढतेच आहे. कलणे थांबवण्यासाठी मनोर्‍याच्या झुकावाच्या विरुद्ध बाजूला पायात ६०० टन शिसे भरण्याचा प्रयोग मात्र थोडाफार यशस्वी झाला. तिरकेपणा जाणवू नये, म्हणून एक बाजू दुसरीपेक्षा थोडी उंच बांधण्यात आली; मात्र यामुळे टॉवर थोडा वक्र झाला. इ.स. १३१९मध्ये सातवा मजला बांधून झाला.

इ.स.१३७२मध्ये मनोर्‍यातील घंटेची खोली बांधण्यात आली. सप्तसुरांशी निगडित सात घंटा इथे आहेत. तळमजल्याला पंधरा कमानी आहेत. त्यानंतरच्या सहा मजल्यांना प्रत्येकी ३० व शेवटच्या मजल्याला १६ कमानी आहेत. टॉवरची उंची बुटक्‍या बाजूने ५५.८६ मीटर व उंच बाजूने ५६.७ मीटर आहे. आतमधून जाणार्‍या गोल जिन्याला २९६ पायर्‍या आहेत. १९९० ते २००१च्या डागडुजीपूर्वी ५.५ अंशांनी कललेला मनोरा आता ३.९९ अंशांनी कलला आहे. म्हणजे तळमजल्यापेक्षा आठवा मजला ३.९९ अंशांनी झुकला आहे. त्याआधी मनोर्‍याचा झुकाव ओळंब्याच्या बाहेर साडेचार मीटर होता तो नंतर ३.८ मीटरवर स्थिर झाला. अत्यंत मोहक अशा पांढर्‍या संगमरवराच्या शुभ्र खांबांनी आणि जाळीदार झरोक्यांनी प्रत्येक मजला सुशोभित झालेला हा मनोरा त्याच्या सौंदर्यापेक्षा त्याच्यातल्या दोषामुळेच अधिक प्रसिद्धी पावला.

दुसर्‍या महायुद्धादरम्यान मित्र राष्ट्रांना असे कळले, की जर्मन लोक या मनोर्‍याचा उपयोग टेहळणी बुरूजासारखा करतात; परंतु ज्या अमेरिकन सार्जंटवर टॉवर उद्‌ध्वस्त करण्याची जबाबदारी टाकली होती, त्याने तो उद्‌ध्वस्त न करण्याचा निर्णय घेतला. इ.स. १९८७मध्ये पिसाच्या मनोर्‍याला जागतिक वारसा स्थान म्हणून घोषित करण्यात आले. ७ जानेवारी १९९०मध्ये लोकांसाठी हा मनोरा बंद करण्यात आला. वजन कमी करण्यासाठी सर्व घंटा काढून टाकण्यात आल्या. त्यानंतर तिसर्‍या मजल्याभोवती केबल्स आवळून त्या दूरवर रोवण्यात आल्या. टॉवर जमीनदोस्त होण्यापासून वाचण्यासाठी त्याच्या उंच भागाखालची ३८ क्‍युबिक मीटर(फक्त?) माती काढण्यात आली. दशकभराच्या प्रयत्‍नांनंतर डिसेंबर २००१मध्ये हा टॉवर पुन्हा खुला करण्यात आला. नंतर २००८मध्ये पुन्हा ७० मेट्रिक टन माती काढण्यात आली. आता पुढची दोनशे वर्षे तरी त्याला धोका नाही, असे सांगितले जाते. मिनार्‍याच्या इतिहासात पहिल्यांदाच हा टॉवर कलण्याचा थांबला आहे

गॅलिलिओने गुरुत्वाकर्षण सिद्ध करण्यासाठी अनेक प्रयोग ह्याच मनोऱ्यावरून केले होते. त्यासाठी त्याने या मनोऱ्यावरून दोन निरनिराळ्या वजनाचे धातूचे गोळे खाली टाकले होते. खाली पडणार्‍या वस्तूला लागणारा वेळ हा वजनावर अवलंबून नसतो, हे त्याला सिद्ध करायचे होते. तसेच पिसा शहरातील कॅथेड्रलमधील झुंबरांचे हेलकावे पाहून त्याला पेंड्युलमची कल्पना सुचली.

पिसा शहरातल्या कलणार्‍या इतर इमारती

पिसाच्या कललेला मनोर्‍याला एक वैज्ञानिक चमत्कार म्हणून जागतिक प्रसिद्धी मिळाली असली तरी, पिसा शहरवासीयांना याचे काही अप्रूप नाही; याचे कारण म्हणजे या मनोर्‍याशेजारचे सांता मारिया कॅथ्रेडल आणि बाप्टिस्ट्री यांच्या वास्तूसुद्धा अर्धा ते एक अंशातून कलल्या आहेत. एवढेच नाही तर शहरातील काही खासगी प्रासाद, सेंट मायकेल चर्च आणि सेंट निकोलाय चर्च यांचे बेल टॉवरसुद्धा एक ते दीड अंशातून झुकले आहेत. हा सर्व चमत्कार तिथल्या मूळच्या दलदलीच्या जमिनीमुळे झाला आहे.

Listed in the following categories:
एक टिप्पणी पोस्ट करा
टिपा आणि इशारे
द्वारा व्यवस्था करा:
Elliott Brown
8 July 2018
Very busy site with the historic tower. If you want to go up pre-book online for a 30 minute slot (I didn't book in the end!). Just nice to see the tower and other buildings here!
Russ
17 March 2017
Lovin' this astonishing view of the leaning tower of Pisa. You must find the right angle to make a perfect 3D photo.
Ollie Martin
7 August 2014
The tower began leaning after just 2 floors were built, but 100 years later they carried on building another 8 floors. And even though it could be corrected, they decided not to as its lean is famous.
Gamze Alhamo Sarıtaş
20 November 2016
Great architectural details interior and exterior. The tower began leaning after 2 floors were built, but 100 years later they carried on building another 8 floors.
Daniel????
6 September 2021
It’s beautiful you must go see it
Nm
3 October 2019
Very interesting architecture .. Wonderful experience .. A bucket list item !! Not to miss while in Italy .. Enjoy taking pictures while holding up the tower !!
9.0/10
Arina, Саша Молодцов आणि 95,356 अधिक लोक येथे आहेत
NH Pisa

प्रारंभ करत आहे $197

Hotel Alessandro Della Spina

प्रारंभ करत आहे $167

Hotel Touring

प्रारंभ करत आहे $109

Hotel Minerva

प्रारंभ करत आहे $115

B&B Guerrazzi

प्रारंभ करत आहे $106

Affittacamere Leopolda

प्रारंभ करत आहे $131

जवळपास शिफारस केलेल्या दृष्टी

सर्व पाहा सर्व पाहा
विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Camposanto Monumentale

The Camposanto Monumentale ('monumental cemetery') is a historical

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
पियाझ्झा देई मिराकोली

पियाझ्झा देई मिराकोली हि इटलीच्या टस्कॅनी प्रांतातील येथील पिसा गा

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Baptistry (Pisa)

The Baptistry of St. John (Italian: Battistero di San Giovanni) is a

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Orto botanico di Pisa

The Orto botanico di Pisa, also known as the Orto Botanico

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
San Sisto, Pisa

San Sisto is a church in Pisa, Tuscany, Italy.

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Torre dei Gualandi

The Torre dei Gualandi (also known as the Muda Tower,) is a former

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Church of St. Rocco (Pisa)

San Rocco is a small church facing the Piazza dei Cavalieri in

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Knights' Square (Pisa)

The Knights’ Square (italiano. Piazza dei Cavalieri) is one of the m

अशीच पर्यटकांची आकर्षणे

सर्व पाहा सर्व पाहा
विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Belfry of Kortrijk

The belfry of Kortrijk, or Belfort in Dutch, is a medieval bell tower

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Two Towers

The Two Towers, both of them leaning, are the symbol of Bologna,

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Oude Kerk (Delft)

The Oude Kerk (Old Church), nicknamed Oude Jan ('Old John'), is a

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
ऑलिंपिक मैदान (माँत्रियाल)

The Olympic Stadium (French: Stade olympique) is a multi-purpose

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Towers of Bologna

The Towers of Bologna are a group of medieval structures in Bologna,

सर्व समान ठिकाणे पहा